2021 मध्ये तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम ! Calling आणि Data साठी मोजावे लागणार जास्त पैसे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात टेलिकॉम कंपन्या त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मोबाईलवर बोलणं आणि इंटरनेट वापरणं महाग होणार आहे. 2021-22 या नवीन आर्थिक वर्षात टेलिकॉम कंपन्यांनी 13 टक्के महसूल वाढीचं लक्ष ठेवलं आहे. कारण सरासरी महसूल (ARPU) आणि डेटा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत इंफॉर्मेशन अँड क्रेडिट रेटींग एजन्सी आयसीआरएच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्यांमार्फत मोबाईलच्या रिचार्जचे दर वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

रिचार्ज महाग होण्याचं कारण काय ?
आयसीआरएच्या अहवालानुसार, अनेकांचा आता वर्क फ्रॉम होमवर भर आहे. परिणामी डेटाचा वापर वाढला आहे. त्यामुळं येत्या काळात टेलिकॉलम सेवेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की, रिचार्जच्या किंमतीत वाढ होणयाची शक्यता आहे. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी शुल्क वाढवलं होतं. त्यामुळं दूरसंचार कंपन्यांनी चांगली कमाई केल्याचं दिसून आलं.

कर्ज काढण्याची शक्यता
आयसीआरएच्या अहवालानुसार, आता टेलिकॉम कंपन्यांचं कर्जही कमी होण्याची शक्यता आहे. एक अदाज असं सांगतो की, 2021 या आर्थिक वर्षात टेलिकॉम उद्योगांचं कर्ज हे 4.9 लाख कोटी रुपयांचं कर्ज असेल. 2022 या आर्थिक वर्षात दूससंचार उद्योगाचं अंदाजे 4.7 लाख कोटी कर्ज असेल. टेलिकॉम क्षेत्रात सरकार मदत करण्याची शक्यता आहे. सरकारनं नोव्हेंबर 2019 मध्ये आर्थिक मदतीची ऑफर दिली होती.

आता 1 जानेवारी 2021 पासून म्हणजेच आगामी नवीन वर्षापासून अनेक महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहे. याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून, चेक देताना होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली, भारतभरातील सर्व चारचाकी वाहनांसाठीचं अनिवार्य असणारं फास्टॅग आणि छोट्या व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) रिटर्न भरण्यासाठी नवीन सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं नवीन नियम लागू होण्याआधीच त्याविषयी सर्वांना माहिती होणं आवश्यक आहे.