FASTag नसला तरी आता नाही भरावा लागणार दुप्पट टोल, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – १ जानेवारी २०१९ पासून सर्वच चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील टोलनाक्यांवर डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टीमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एक जानेवारीपासून गाड्यांना देखील फास्टट्रॅक लावणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारचा रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक केला आहे फास्टट्रॅक नसणाऱ्या दुप्पट पैसे वसूल करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

तुमच्याकडे FASTag नसल्यास आपली गाडी तोल पार करू शकणार नाही. FASTag न लावणाऱ्या वाहन चालकांकडून दुप्पट दोन वसूल करण्याची सरकारची योजना होती. एका विशेष सेवेचा वापर करून FASTag नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं. १ जानेवारी २०१९ पासून टोलनाक्यांवरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड फर्स्ट’साठी रूपांतरित केल्या जातील. ही सुविधा हळूहळू FASTag सर्व लेन मध्ये रुपांतरीत केले जाईल. त्यामुळे कोणत्याही टोल प्लाझा वर रोख रक्कम घेतली जाणार नाही.

जर FASTag नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणा टाळायचा असेल तर प्री- पेड टच गो कार्ड सेवा वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी एक जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री- पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रीपेड कार्ड रोखीच्या व्यवहारात पर्याय ठरणार आहेत.ल जर तुमच्या गाडीवर FASTag नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट ऑफ सेल्सकडून हे प्रीपेड खरेदी करू शकता आणि FASTag ऐवजी हे कार्ड वापरल्यास तो दुप्पट होणार नाही.

प्रीपेड कार्ड FASTag असल्यावरही वापरता येतं. FASTag ब्लॅक लिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्याच्या कार्डचा वापर करता येईल. प्रीपेड कार्ड खरेदी आणि रिचार्ज साठी प्रत्येक टोल नाक्यावर दोन-तीन तयार केले जातील. कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहक नेट बँकिंगद्वारे किंवा पीओएसवर रिचार्ज करू शकतात. प्रत्येक टोल नाक्यावर रोखीचे व्यवहार यासाठी सध्या दोन लेन नाहीत मात्र १ जानेवारी जानेवारीपासून या लेन बंद ठेवल्या जाणार आहेत. एक फास्टॅग एका वाहनपेक्षा जास्त लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगळे फास्टॅग घ्यावे लागतील.

फास्टॅग कसा काढायचा?

– फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या २२ राष्ट्रीयकृत बँकेचा पर्याय देण्यात आला आहे.
– या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल.
– बँकेचे खाते जोडताना केवायसी असणे आवश्यक आहे.
– Paytm, Amazon pay, Fino payments Bank आणि Paytm payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तुम्ही फास्टॅग काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

– जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यामध्ये लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेट मध्ये पैसे भरण्याची गरज नाही.
– तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल.
– फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.