रिअल लाईफ हिरो भारतात परतला, ‘त्या’ 56 तासांत नेमकं काय घडलं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले. पाकिस्तानचं F-16 हे विमान अभिनंदन यांनी पाडलं होतं. असा हा जाबाज वाघ काल वाघा बाॅर्डरमार्गे भारतात परतला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. देशभरातून लोकांनी वाघावर गर्दी केली होती. काल (शुक्रवार दि 1 मार्च) ते सुखरूप परतल्यानंतर भारतीयांच्या आनंदाला पारावारा उरला नाही.

आपण अभिनंदन यांची पाकिस्तानचं विमान पाडल्यापासून ते त्यांची सुटका झाल्यानंतर आतार्यंतची पूर्ण काहणी आपण जाणून घेणार आहोत.

– भारतावर झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाने कारवाई केली. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उध्वस्त केले. या कारवाईत या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचा भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा करण्यात आला. याशिवाय अनेक कमांडरही मारले गेले. भारतीय हवाई दलाच्या मिराज 2000 या विमानांनी ही कारवाई केली आणि यानंरतर ही विमाने सुरक्षित भारतात परत आली.

– यानंतर पाकिस्तानने नापाक बेत आखला आणि 27 फेब्रुवारीला त्यांच्या 3 लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेकडून पाकला मिळालेल्या एफ-16 या विमानाचाही समावेश होता.

– या हल्ल्यादरम्यान भारताने दक्षता राखत या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात मिग-21 या विमानाचा समावेश होता. मुख्य म्हणजे या विमानाचे सारथ्य विंग कमांडर अभिनंदन करत होते.

– दोन्ही विमानं आमने सामने आल्यानंतर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडलं. यादरम्यान भारताचं मिग-21 हे विमान कोसळलं. हे विमान अभिनंदन यांचं होतं. ते पाकच्या हद्दीत जाऊन कोसळलं. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या मदतीने स्वत:ची सुटका केली. परंतु ते पाकच्या हद्दीत असल्याे तेथील नागिरकांनी त्यांना मारहाण केली. यानंतर त्यांना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले.

– यानंतर पाकने भारताचे दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी यु टर्न घेतला आणि एकच वैमानिक ताब्यात असल्याचं सांगितले. यानंतर त्यांचा एक व्हिडीओ  ही व्हायरल करण्यात आला. ज्यात IAF पायलट विंग कमांडर अभिनंदन यांची ओळख सांगण्यात आली.

– भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं त्यावर आक्षेप घेतला आणि वैमानिकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा असा व्हिडीओ  बनवणे म्हणजे जिनिव्हा कराराचं उल्लंघन असल्याचा आरोप भारताने पाकवर केला. यानंतर त्या जवानाला त्वरीत सोडण्याचा इशारा दिला.

– यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चा करण्याची अट घातली. पाकला युद्ध नको तर चर्चा हवी असे त्यांनी सांगतिले. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला. आपले म्हणणे स्पष्ट केले.

– यानंतर पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी 28 फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवून दोन्ही देशातील तणाव निवळणार असेल तर नक्कीच त्यांच्या सुटकेचा विचार करु असे म्हणणे मांडले. परंतु भारताने स्पष्ट भाषेत ठणकावत कोणत्याही अटी-शर्थींशिवाय विंग कमांडरला सोडण्याचा इशारा दिला.

– यानंतर 28 फेब्रुवारीला इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा संसदेत केली.

– भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला ताब्यात घेतल्यानंतर मोदी म्हणाले होते की, आताच एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. पहिल्यांदा प्रॅक्टिस करत होतो. खरे काम तर अजून बाकी आहे.

– यानंतर 28 फेब्रुवारीलाच भारताच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत यात पाकिस्तानचा पर्दा फाश केला. एफ-16 चे पुरावेही सादर केले.

– यानंतर 1 मार्च रोजी वाघा बाॅर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागताची जंगी तयारी केली. लोक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास विंग कमांडर अभिनंदन यांची सर्व कागदोपत्री प्रक्रिया आणि काही चाचण्या केल्यानंतर त्यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आलं.