‘बिग बॉस मराठी’ची मेघा धाडे ठरली विजेती

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

कलर्स मराठीवर पार पडलेल्या मराठी बिग बाॅस या रीऍलिटी शाे मध्ये मेघा धाडे विजेती ठरली आहे. तिला फायनल तीन मध्ये पुष्कर जोग स्मिता गोंदकर यांनी टक्कर दिली.  बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आज (रविवार) संध्याकाळी सात वाजल्यापासून चालु झाला. वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले हाेते. सहा स्पर्धकांमध्ये गेल्या आठवड्यापासून चढाओढ दिसत असून प्रेक्षकांकडून बरेच अंदाज व्यक्त करण्यात येत हाेते. सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत,पुष्कर जोग, मेघा धाडे, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर असे सहा स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये होते. यापैकी नंतरच्या बाद फेरित शर्मिष्ठा राऊत,आस्ताद काळे, सई लोकूर, स्मिता गोंदकर आणि  पुष्कर जोग  बाद हाेऊन घराबाहेर पडले. आणि  मेघा धाडे विजेती ठरली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e5eff48-8dd6-11e8-b2f0-737ff5a8d2c6′]

बिग बॉसच्या घरातील आस्तादचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता. पुरुषांपैकी आस्ताद आणि पुष्कर या दोघांनी ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली. आस्ताद आणि पुष्करची जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. कारण लोकप्रियता आणि बिग बॉसच्या घरातील वावर पाहता पुष्कर नेहमीच आस्तादपेक्षा उजवा ठरला हाेता. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांपैकी सर्वांत आधी शर्मिष्ठा बाद झाली. त्यापाठोपाठ आस्ताद ,सई लोकूर, स्मिता गोंदकर व पुष्कर जोग बाहेर पडले.

ग्रँड फिनालेमध्ये अनेक तारे तारकांनी हजेरी लावली. महेश मांजरेकरांचे सूत्रसंचालन भाव खाऊन गेले. रंगेबिरंगी लाइट्स च्या सानिध्यात अनेक तारे तारकांनी नृत्य सादर केले आणि प्रेक्षकांनाही आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23b43345-8dd6-11e8-95ff-1701bb612ad6′]

घराघरात बिग बॉस रियालिटी शो ने वेड लावले होते. सुमारे शंभर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी पहिल्या वहिल्या मराठी बिग बॉस ला आपली विजेती मेघा धाडे च्या रुपात मिळाली. एकूण अठरा स्पर्धकांतून तिचे नाव घोषित झाले. विजेती म्हणून नाव घोषित झाल्याझाल्या मेघावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे