Winters Health : हिवाळ्यात वाढतात अस्थमा रुग्णांच्या अडचणी, ‘या’ 12 पध्दतीनं काळजी घ्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हिवाळ्यात अस्थमाच्या रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. श्वसनमार्गात असलेली सूज थंडीत आणखी वाढते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यातच प्रदूषण आणि थंडी असा दोन्हीकडून मार पडतो. मात्र, ही समस्या नियंत्रित करता येऊ शकते.

ही आहेत कारणे

* हिवाळ्यात थंडी, कोरड्या हवेमुळे श्वसनमार्गात सूज येते.

* सर्दी, फ्लू आणि व्हायरसचा धोका वाढतो.

* या काळात कफसुद्धा जास्त तयार होतो.

* या सर्वांमुळे इन्फेक्शन वाढते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

अशी घ्या काळजी

1) थंडीत जास्तीत जास्त घरात राहण्याचा प्रयत्न करा.

2) बाहेर जायचे असेल तर तोंड आणि नाक मास्कने पूर्णपणे कव्हर करा.

3) मास्क नको असेल तर स्कार्फने चेहरा झाकून घ्या.

4) थंडीत पाणी कमी प्यायले जाते, यामुळे द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवा. यामुळे कफ बाहेर येण्यास मदत होते.

5) घरातील आजारी व्यक्तीपासून दूर राहा.

6) जास्तवेळ घरात राहायचे असेल तर घर स्वच्छ ठेवा. कारण धुळीचा त्रास होऊ शकतो.

7) चादर आठवड्याला गरम पाण्याने धुऊन काढा.

8) बाहेर एक्सरसाइज करण्यासाठी जाणार असाल तर अर्धा तास अगोदर इन्हेलरचा वापर करून निघा. यामुळे श्वसनमार्ग खुला राहील. श्वास घेण्यास त्रास होणार नाही.

9) इन्हेलर नेहमी सोबत ठेवा.

10) वेळोवेळी हात स्वच्छ करा.

11) तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहा.

12) जास्तच थंडी असेल तर अगोदरच अस्थमाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.