Winter tips : थंडीच्या दिवसातील ‘या’ 7 चूका तुमच्या शरीराला बनवू शकतात 7 आजारांचा अड्डा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात खाणेपिणे, झोपणे आणि गरम पाण्याने आंघोळ करताना मजा येते, मात्र तितकाच हा हंगाम आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. थंडीत इम्यून सिस्टम कमजोर होते. यामुळे अनेक लोक सर्दी, खोकला, ताप आणि फ्लू सारख्या लक्षणांचा सामना करतात. थंडीत कोणत्या समस्या जाणवतात आणि त्यांचे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

1 जीभ सामान्यपेक्षा जास्त काम करते
थंडीत ओठ सुखण्याचा धोका जास्त असतो. यासाठी काही लोक त्यावरून जीभ फिरवतात. यामुळे तात्पुरते बरे वाटते पण ओठ खराब होऊ शकतात. लाळेचे वेगाने बाष्पिभवन होते, यामुळे पहिल्यापेक्षा ओठ जास्त सूखतात.

2 दातांची समस्या
संवेदनशील दात असल्यास थंडीत खुप वेदना होऊ शकतात. थंड हवा दातांच्या आतील नसांपर्यंत पोहचू शकते आणि दातांना दुखापत करू शकते. यासाठी थंडीत तोंड बंद ठेवा. मास्कने कव्हर करा.

3 ब्लड शुगर वाढू शकते
थंडीत स्ट्रेस हार्मोन वाढतात, यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. परिणामी थंडीत अनेक लोक बीपीच्या समस्येने त्रस्त असतात. एक्सपर्ट आणि डॉक्टर सल्ला देतात की, यासाठी रोज व्यायाम करा. घरात विविध कामे करा.

4 वजन कमी होऊ शकते
थंडीत वजन कमी होते. कारण थंडी लागत असल्याने शरीराला कॅलरी बर्न करणे आणखी सोपे होते. जर तुम्ही अशक्त, अंगाने बारीक असाल तर खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

5 सुरकुत्यांची समस्या होऊ शकते
थंडीत त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. थंडीत हवेतील आद्रता कमी होते, त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्याने सुरकुत्या येण्याचा धोका असतो.

6 डोळे होऊ शकतात कमजोर
अश्रूंचा पातळ थर डोळ्यांना कव्हर करतो. मात्र, थंडीत कोरड्या हवेतील उन्हामुळे डोळे कोरडे होतात. यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. यासाठी यूव्ही-ब्लॉकिंग चष्मा घाला.

7 डिहायड्रेशन
थंडीत तहान कमी लागते. लोग पाणी पिण्यास विसरतात. यामुळे डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याच्या कमतरतेची समस्या होते. कमी तहान लागण्याचा अर्थ असा नाही की तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यक कमी आहे. योग्य प्रमाणात पाणी, जेवढी नेहमी तुमच्या शरीराला गरज असते.