दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह ५८ यात्रेकरूंना चीनच्या सरहद्दीवर धरले वेठीस 

ADV

पुणे:  एनपी न्यूज नेटवर्क

कैलास मानस सरोवर तीर्थयात्रेसाठी पुणे ,बेळगाव ,मुंबई ,धुळे,बारामती  येथून  गेलेल्या ५८ यात्रेकरूंना गेल्या तीन दिवसांपासून चीनच्या सरहद्दीवर वेठीस धरले आहे. अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. पुण्यातील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून हे ५८ यात्री कैलास मानस सरोवर च्या यात्रेकरिता निघाले होते. पुण्यातील ट्रॅव्हल एजन्सीकडून सलग्न असलेली नेपाळ मधील ट्रॅव्हल एजन्सी ५४ लाखांची मागणी करीत आहे.  या ५८ यात्रीमध्ये दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ADV

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57dc6c8c-786a-11e8-a301-dd299419b6ce’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका खासगी ट्रॅव्हल कंपनी कडून ५८ यात्रेकरू कैलास मानस सरोवर सरोवर तीर्थयात्रेसाठी गेले होते. दिनांक २३ जून रोजी काठमांडूपासून या यात्रेला सुरुवात झाली. दिनांक २४ जून ला हे यात्रेकरू चीनच्या सरहद्दी वरील तेमुरी येथे पोहचले. पुण्यातील खासगी ट्रॅव्हल कंपनी नेपाळच्या ”द ट्रेकर्स सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड ” रॅडिसन लेन, लाझिपत काठमांडू नेपाळ या कंपनीला ५४ लाख रुपये देण्याकरिता वाद सुरु आहे. पण या दोन ट्रॅव्हल एजन्सी मुळे या ५८ यात्रेकरूंना ३ दिवस वेठीस धरले आहे. या यात्रेकरूंचे पासपोर्ट आणि व्हिजा तयार असताना देखील केवळ पुण्यातील खासगी एजन्सी आणि नेपाळ मधील एजन्सी यांच्यातील पैशाच्या वादामुळे या यात्रेकरूंना  नेपाळच्या ट्रॅव्हल कंपनीचे लोक चीनची सरहद्द पार करू देत नाहीत. जेव्हा पुण्यातील ट्रॅव्हल कंपनी ५४ लाखांची रक्कम भरेल तेव्हाच यात्रेकरूंना पुढील प्रवास करता येईल असे नेपाळच्या ट्रॅव्हल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या ५८ लोकांना मात्र तीन दिवस मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. ही यात्रा सुरळीत व्हावी अशी आशा यात्रेकरू करीत आहेत. यात पुण्यातील  दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

चीनच्या सरहद्दीवर अडकलेल्या ५८ लोकांची दखल भारतीय दूतावासांकडून घेण्यात आली असून पैशासाठी वेठीस धरलेल्या ५८ नागरिकांची समस्या सोडवण्यात आली आहे.