‘त्या’ महिला डॉक्टरची आत्महत्या आणि रॅगिंग प्रकरणी महिला आयोगाची नायर रुग्णालयाला नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रशासनाला नोटीस पाठविली आहे. यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी. तसेच रॅगिंगविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती कारवाई केली. याचा अहवाल ८ दिवसांच्या आत सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

मुळची जळगावची असलेल्या डॉ. पायल तडवी नायर वैद्यकिय महाविद्यालयात पदव्यूत्तर शिक्षण घेत होती. तिच्या सिनीअर डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंग आणि अपमानास्पद वागणूकीची तिने १० मे राज्याचे आरोग्यमंत्री, आग्रीपाडा पोलीस स्टेशन, नायर हॉस्पीटलचे एचओडी यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. असा आरोप तिची आई आबेदा तडवी यांनी केला होता. त्यामुळे तिला आपली जीवनयात्रा संपवावी लागली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी नातेवाईकांनी पायलचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून आंदोलन केल होते.

त्यानंतर याप्रकरणावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर याची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. महिला आयोगाने थेट नायर हॉस्पीटल प्रशासनाला यासंदर्भात नोटीस पाठविली आहे. नायर हॉस्पीटल मध्ये रॅगींगविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते का? आणि विद्यार्थी व वरिष्ठ अधिकारी यांच्यात सुसंवाद आहे का असे प्रश्न उपस्थित करत राज्य महिला आयोगाने नायर हॉस्पीटलला रॅगींगविरोधी कायद्याची अंमलबजावणीसाठी कोणती कारवाई करण्यात येणार आहे. याचा अहवाल ८ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले.