35 वर्षीय तरूणीने 1 लाख रुपये खर्च करून स्वत:शीच केला विवाह, नंतर आरशात पाहून स्वत:लाच केले KISS

नवी दिल्ली : सामान्यपणे विवाह मुला-मुलीचा होतो. काही प्रकरणात सेम जेंडरच्या दोन व्यक्तींमध्ये सुद्धा विवाह झाल्याचे आपण पाहिले असेल, पण स्वत:च स्वत:सोबत लग्न केल्याचे कधी ऐकले आहे का? तुम्ही सुद्धा विचार करत असाल की, एकच व्यक्ती विवाह कशी करू शकते? परंतु, हे सत्य आहे.

टाइम्स नाऊनुसार, स्वत:शीच विवाह करणाची ही घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेत एका तरूणीने आपल्या प्रियकराशी रिलेशनशिप संपवल्यानंतर एखाद्या दुसर्‍या व्यक्तीशी विवाह करण्याऐवजी स्वत:शी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आपल्या या निर्णयानंतर तरूणीने एका विवाह सोहळ्याचे सुद्धा आयोजन केले.

मीडिया रिपोर्टनुसार, मुलीने या विवाह सोहळ्यात 1,000 अमेरिकन डॉलर (सुमारे 1.02 लाख रुपये) खर्च सुद्धा केले. या विवाह सोहळ्यात मुलीने स्वत:शीच विवाह केला. विवाहानंतर आरशात आपला चेहरा पाहून तरूणीने स्वत:लाच किस सुद्धा केले.

जून 2020 मध्ये आपल्या प्रियकराशी तरूणीचे सहमतीने ब्रेकअप झाले होते. अटलांटाच्या राहणार्‍या या मुलीला 2020 मध्ये आपल्या प्रियकराशी विवाह करायचा होता. परंतु, काही कारणामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या ब्रेकअपच्या नंतर मुलीने आपला विवाह काहीतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा आणि सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑर्डर केला आवडता केक आणि ड्रेस
मीडिया रिपोर्टनुसार, या मुलीने कोणताही वर नसलेल्या आपल्या विवाहाच्या योजनेवर काम करण्यास सुरूवात केली. इतके की, यानिमित्ताने तिने आपल्या आवडीचा केक आणि ड्रेस ऑर्डर केला. तसेच विवाहासाठी तिने हिर्‍याची अंगठी सुद्धा खरेदी केली.

35 वर्षीय या तरूणीने तयारी केल्यानंतर एका औपचारिक सोहळ्याचे आयोजन करून स्वत:शीच विवाह केला. तिने म्हटले, तिने आपल्या जीवनाबाबत एक योजना तयार केली आहे आणि आनंदी राहून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.