खुशखबर ! ‘कामगारांना’ ३ हजाराच्या ‘पेन्शन’सह मिळणार ‘फॅमिली पेन्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून फेब्रुवारी २०१९ पासून कामगारांसाठी पेंशन योजना राबवली जात आहे. ही योजना आहे ‘पंतप्रधान श्रमयोगी मानधन’ योजना. यात कामगारांना ६० वर्षांनंतर ३००० रुपये प्रतिमहिना या हिशोबाने पेंशन मिळणार आहे. यात फॅमिली पेंशनची सुविधा देखील देण्यात येणार आहे. सरकारने आता घोषणा केली आहे की या योजनेचा फायदा देशातील १५ लाख लोकांना द्यायचा आहे. याचा सर्वात जास्त फायदा रियल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळणार आहे.

काय आहे फॅमिली पेंशन

फॅमिली पेंशन योजना ती आहे ज्यात पतीच्या मृत्यूनंतर पेंशन ट्रान्सफर होते. म्हणजेच पेंशन योजनेत पत्नीला नॉमिनी ठेवले जाते. याचा फायदा हा होतो की जर ६० वर्षांनंतर पतीचा मृत्यू झाला तर त्या पेंशनचा लाभ पत्नीला मिळतो परंतू यात असलेल्या अटींनुसार या पेंशनची ५० टक्के रक्कम पत्नीला दिली जाते. परंतू जर पतीचा वयाच्या ६० वर्षांआधीच मृत्यू झाला तर पत्नीला पूर्ण पेंशनचा लाभ मिळेल.

कशी मिळणार पेंशन

कामगारांना दरमहा ३००० रुपये महिना पेंशन मिळण्याचा हिशोबाने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेमध्ये काही रक्कम दरमहा जमा करावी लागेल, ही रक्कम वेगवेगळ्या वयोमानानुसार वेगवेगळी आहे.

वयोमानानुसार रक्कम

१) १८ ते २५ वय – ५५ रुपये दरमहा

२) २५ ते ३० वय – ८० रुपये दरमहा

३) ३० ते ३५ वय – १०५ रुपये दरमहा

४) ४० ते ६० वय – २०० रुपये दरमहा

आरोग्यविषयक वृत्त –