तुमच्या मनातही आहेत का? रक्तदानाविषयी हे ‘गैरसमज’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज जागतिक रक्तदान दिवस आहे. हा दिवस याच्यासाठी महत्वाचा आहे कि, लोकांनी रक्तदान करावे. आणि रक्तदानाची जनजागृती व्हावी. जेणेकरून लोक स्वतःहून रक्तदान करतील. आज रक्तदान दिवस असल्यामुळे संपूर्ण भारतात अनेक ग्लोबल इव्हेंट आयोजित केले जात आहेत. तसेच प्रत्येक वर्षी एक नवीन थीम घेऊन रामदानाविषयी जनजागृती केली जाते. या वेळेस रक्तदान दिवसासाठी “ब्लड डोनेशन एंड यूनिवर्सल एक्सेस टू सेफ ब्लड ट्रांसफ्यूजन” हि थीम घेतली आहे. आणि या थीम नुसार जागतिक रक्तदान दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या कार्यक्रमाच आयोजन करण्याचा महत्वाचा उद्देश हाच आहे. कि, अगदी तळागाळातील लोकांना रक्तदानाचे महत्व समजावे. कारण रक्त हे फक्त माणसाच्या शरीरातच तयार होते. त्यामुळे अपघात झालेल्या रुग्णांना किंवा इतर रुग्णांना अचानक कधीही रक्ताची कमतरता भासू शकते. आणि ऐनवेळी रक्त उपलब्ध नसेल तर तो रुग्ण दगावण्याची दाट असते. त्यामुळं आपण रक्तदान करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या रक्तामुळे एखाद्याला जीवदान मिळेल.

परंतु काही लोकांचा असं समज असतो. कि आपण रक्तदान केलं तर आपल्या शरीरातील रक्त कमी होईल किंवा आपण आजारी पडू. किंवा रक्तदान केल्यामुळेआपल्याला इंफेक्शन होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक रक्तदान करत नाहीत. काहींना वाटत आपला वेळ वाया जाईल. पण याला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. आणि आपण जर रक्तदान केलं. तर आपल्या शरीरात रक्तदानानंतर ४८ तासात पुन्हा नवीन रक्त तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. त्याचा फायदा आपल्यालाही होतो. आणि इतरांनाही होतो. त्यामुळे रक्तदानाविषयीचे गैसमज मनातून झटकून टाका. आणि रक्तदान करा.

फेसबुक पेज लाईक करा –