World Cup 2019 : इंग्लंडच्या टीममध्ये मोठा बदल ; ‘या’ नवीन खेळाडूंना संधी तर ‘यांची’ हकालपट्टी

लंडन : वृत्तसंस्था – विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघांनी यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा देखील केली आहे. यातच आता इंग्लंडच्या संघाने देखील आपल्या संघात महत्वपूर्ण ३ बदल केले आहेत. अवघे काही दिवस शिल्लक असताना इंग्लंडने आपल्या संघात हे महत्वपूर्ण बदल केले आहेत.

ऑलराऊंडर जोफ्रा आर्चर, डावखुरा स्पिनर लियाम डॉसन आणि जेम्स विन्स यांना संधी देण्यात आली आहे. त्याऐवजी जो डेन्ली, डेव्हिड विली आणि ऍलेक्स हेल्स यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उत्तेजनार्थ औषधं घेतल्याप्रकरणी आधीच ऍलेक्स हेल्सवर बंदी घालण्यात आली होती. काउंटीमध्ये छगनगळी कामगिरी केल्याने त्याचे बक्षीस म्हणून लियाम डॉसनचा समावेश विश्वचषक संघात झाला आहे. त्याचबरोबर नवोदित जोफ्रा आर्चर याचा समावेश महत्वाचा आहे. वेगवान गोलंदाजी आणि वैविध्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचा समावेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र प्राथमिक निवडीत त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता.

वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ

इयोन मॉर्गन (कर्णधार), जॉस बटलर, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, टॉम कुरन, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जेम्स विन्स, क्रिस वोक्स, मार्क वूड.