World Cup 2023 | ऐतिहासिक कामगिरीनंतरही सुपर ‘सेव्हन’ मोहम्मद शमीने व्यक्त केली खंत, म्हणाला – ‘त्यावेळी खुप वाईट ….’

मुंबई : World Cup 2023 | जेव्हा माझ्याकडून केनचा झेल सुटला तेव्हा मी खुप दबावाखाली आलो होतो. आणि मला त्यावेळी खुप वाईट वाटले होते. परंतु निराशा मागे टाकत मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले, अशी खंत मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सामन्यानंतर व्यक्त केली. न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ऐतिहासिक गोलंदाजी केली, ज्यामुळे टीम इंडियाने हा सामना ७० धावांनी जिंकून विश्वचषक (World Cup 2023) उपांत्य फेरी गाठली.

तसेच वन डे प्रकारात एका सामन्यात ७ बळी घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला. इतकी चांगली कामगिरी करूनही शमीच्या मनात खंत होती, जी त्याने सामन्यानंतर व्यक्त केली.

सामन्यानंतर शमी म्हणाला, जेव्हा तुम्ही विश्वचषकासारख्या मंचावर तुमच्या देशासाठी खेळत असता तेव्हा खूप छान वाटते. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही सेमीफायनलमधून बाहेर पडलो होतो आणि ते खूपच निराशाजनक होते. त्यामुळे यावेळी आम्ही विश्वचषक जिंकण्याचे आमचे स्वप्न साकार करण्याची संधी म्हणून पाहिले.

तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुन्हा अशी संधी मिळेल की नाही हे तुम्हाला कधीच माहीत नाही, त्यामुळे हातात आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे महत्त्वाचे असते. तो झेल चुकवल्याबद्दल मला वाईट वाटते, कारण दबावाच्या क्षणी माझ्या हातून तो झेल सुटला जो की सुटायला नको होता, असे शमी म्हणाला. (World Cup 2023)

भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित शर्मा Rohit Sharma (४७) आणि शुबमन गिल Shubman Gill (८०) यांनी जोरदार सुरुवात केली. याच सामन्यात विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०वे शतक पूर्ण करून इतिहास रचला. अय्यरने अवघ्या ७० चेंडूत १०५ धावा करत भारताची धावसंख्या ४००च्या जवळ नेली. भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे भलेमोठे आव्हान उभे केले.

नंतरच्या डावात मोहम्मद शमीने (Mohammad Shami) न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत भारताची बाजू मजबूत केली.
मोहम्मद शमीने डेव्हॉन कॉनवे Devon Conway (१३) आणि रचिन रवींद्र Rachin Ravindra (१३) हे दोघेही विकेटच्या मागे झेलबाद केले.
यानंतर जेव्हा डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) खेळत असताना भारताच्या अडचणीत वाढ झाली होती.

परंतु, शमीने त्याच षटकात विल्यमसन (६९) आणि टॉम लॅथम (०) यांना बाद करत
न्यूझीलंडला सलग दोन धक्के देत टीम इंडियात पुनरागमन केले.
शमीने या सामन्यात ७ विकेट्स घेतल्या. वनडे सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

मिचेल आणि विल्यमसनच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताच्या अडचणी वाढल्या होत्या. मिशेल खूप वेगवान खेळत होता.
धावा आणि चेंडूंचा फरक सतत कमी होत होता आणि अशावेळी मोहम्मद शमीने विल्यमसनचा सोपा झेल सोडला.

बुमराहच्या चेंडूवर विल्यमसनने शॉट खेळला, चेंडू बॅटवर पूर्णपणे आला नाही आणि तो शॉट थेट शमीच्या हातात गेला.
सोपा झेल त्याला पकडता आला नाही. यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली.
सामन्यानंतर शमीने हा झेल सोडल्याबद्दल खंत व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारहाण, दहशत पसरवणाऱ्या तरुणावर FIR