ICC World Cup 2019 : ‘त्या’ सामना फिरवणाऱ्या धावांबद्दल बेन स्टोक्सने न्यूझीलंडची मागितली ‘माफी’

लंडन : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये झालेला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड हा फायनल सामना अनेक क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. नाट्यपूर्णरित्या झालेला हा सामना क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पहायला मिळाला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात इंग्लंडला ओव्हर थ्रोचे अतिरिक्त चार रन मिळाले आणि सामन्याचे पारडेच बदलून गेले. या धावा इंग्लंडच्याच खात्यात गेल्या नसत्या तर न्यूझीलंडला वर्ल्डकपचे विजेतेपद मिळाले असते. याबाबत अष्टपैलू बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली आहे.

शेवटच्या षटकात इंग्लंडला जिंकण्यासाठी १५ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने सिक्स मारून तीन चेंडूत ६ धावा मिळवल्या. आता इंग्लंडला जिंकण्यासाठी ३ चेंडूत ९ धावांची गरज होती. चौथा चेंडू स्टोक्सने मिडविकेट बाउंड्रीवर खेळला आणि स्टोक्स दुसरी धाव घेण्यासाठी धावला, याच वेळी न्यूझीलंडच्या गप्टिलने मारलेला थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेला. या नाट्यपूर्ण घडामोडीमुळे इंग्लंडला ६ धावा मिळाल्या आणि पूर्ण सामनाच फिरला. या नाट्यपूर्ण घडामोडीमुळे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन चांगलाच नाराज झाला. बेन स्टोक्सने या घटनेबाबत नाराज झालेल्या न्यूझीलंड संघाची माफी मागितली आहे.

इंग्लंडला मिळालेल्या त्या चार धावा नियमानुसारच

इंग्लंडला मिळालेल्या ओव्हर थ्रोच्या ४ धावा नियमानुसार अगदी योग्य आहेत. आयसीसीचा नियम सांगतो की, जर बॉल ओव्हर थ्रो होऊन सीमापार गेली असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला चार धावा मिळतात. अशी घटना परत घडू नये अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like