उभारला ‘गेम ऑफ थोन्स’चा महाल, झाली गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गेम ऑफ थ्रोन्स या अमेेरिकन सिरिजला जगभरातील तिच्या चाहत्यांनी डोक्यावर उलचून धरले. आता गेम ऑफ थोन्सच्या एक चाहत्यांनी रेतीत गेम ऑफ थोन्समध्ये दाखवण्यात आलेला काल्पनिक महाल साकारला आहे. हा रेतीतील महाल जर्मनीतील काही लोकांनी मिळून बनवला आहे.

गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद –

हा महाल थॉमस वेन डंगन यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला आहे. त्या डंगन यांना त्यांच्या 20 सहकाऱ्यांनी मदत केली. या बनवण्यात आलेल्या आकर्षक महालामुळे त्यांच्या टीमची गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या आकर्षिक अशा बनवण्यात आलेल्या महालामुळे त्यांचे सर्व गेम ऑफ थोन्सचे चाहते तोंड भरुन काैतूक करत आहेत. त्यांनी केलेला हा महाल सोशल मिडियात चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांकडून या महालाचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. गेम ऑफ थोन्स मध्ये जसा हा काल्पनिक महाल उभारण्यात आला. अगदी तसाच्या तसा महाल डंगन यांच्या टीमने उभारला आहे. त्यांनी उभारलेल्या या महालाची दखल गिनिज वर्ल्ड बुक रिकॉर्डला देखील घ्यावी लागली.

वापरली 11 हजार टन रेती –

रेतीतील हा महाल उभारण्यासाठी डंगन यांच्या टीमला तब्बल 11 हजार टन रेती वापरावी लागली. या रेतीने बनवण्यात आलेल्या सुंदर अशा महालाची उंच 57.95 फूट म्हणचे तब्बल 17.66 मीटर उंच हा महाल साकारण्यात आला आहे. हा किल्ला बिंजमध्ये होणाऱ्या ‘सॅन्ड स्क्लप्चर फेस्टीवल’साठी बनवण्यात आला आहे.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती