अंटार्टिकावरील दिल्‍लीच्या क्षेत्रफळा एवढा ‘हिमनग’ फुटला, संपूर्ण जगाला ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंटार्टिकावर दिल्लीच्या क्षेत्रफळाएवढा आकाराचा मोठा हिमनग तुटला असून त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. अंटार्टिकाच्या ज्या भागावरील हा हिमखंड तुटला आहे तो सर्वात शांत भाग समजला जातो. तुटलेल्या या हिमखंडाचे क्षेत्रफळ हे 1,636 वर्ग किलोमीटर असून दिल्लीचे एकूण क्षेत्रफळ हे 1484 वर्ग किलोमीटर असून हा हिमखंड दिल्लीपेक्षा देखील मोठा आहे.

या हिमनगाचे वजन हे 315 बिलियन टन असुन स्कॉटलंडच्या आइल ऑफ स्कायपेक्षा थोडा छोटा असून याला D28 असेदेखील म्हटले जाते. हा अंटार्टिकावरील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिमनग असून शिपिंगला यामुळे मोठा अडथला येऊ शकतो. 1960च्या दशकात एका मोठ्या हिमनगाला थांबवण्यात यश आले होते, ज्याचा आकार 9,000 वर्ग किलोमीटर इतका होता. त्यामुळे वैज्ञानिकांनी हि महत्वाची घटना असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, युरोपीय संघाच्या सेंटिनल 1 या उपग्रहाने याची छायाचित्रे टिपली असून ती सर्वांसमोर आणली जाणार आहेत.

Visit : Policenama.com