Yashomati Thakur | ‘विक्रम जी, आपल्या वयाचा आदर… ‘, यशोमती ठाकूर यांनी साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाला कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य (Freedom) मिळालेले नाही, तर ते भीक मागून मिळाले आहे, असे विधान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केले. तसेच, विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) विधानचे समर्थन केले होते. गोखले यांच्या वक्तव्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या (Congress leader) व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी एक ट्विट केलं आहे.

विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात नवीन वाद उभा राहिला आहे. त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहे. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी ट्विट मध्ये म्हटले, विक्रम जी, आपल्या वयाचा आदर आहे. मात्र स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपली भक्ती एखाद्या नेत्यावर-पक्षावर असू शकते. पण हा देश, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान त्यापेक्षा कैकपटीने मोठे आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

कंगना राणौत बोलली ते खरे आहे. मी तिच्या मताशी सहमत आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक फाशी जाताना देशातील मोठ मोठे लोक बघत राहिले. त्यांना कोणी वाचवले नाही. ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या लोकांना वाचवले पाहिजे होते, असे विक्रम गोखले यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Yashomati Thakur | minister yashomati thakur attacks on actor vikram gokhale over his statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update