Former Cricketer Yashpal Sharma | माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन, 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत बजावली होती मोलाची कामगिरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Former Cricketer Yashpal Sharma | माजी भारतीय क्रिकेटर आणि सन 1983 चा विश्वचषक जिंकवण्यात मोलाची कामगिरी बजाविणारे यशपाल शर्मा (former cricketer Yashpal Sharma) यांचे आज (मंगळवारी) ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल शर्मा यांच्या निधनानंतर क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे. (yashpal sharma dies of heart attack former cricketer 1983 world cup)

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यशपाल शर्मा (former cricketer Yashpal Sharma) हे 66 वर्षांचे होते. आज (मंगळवार) सकाळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. शर्मांनी इंग्लंडविरूध्द लॉर्ड्समध्ये 1979 मध्ये डेब्यू केला होता तर सन 1983 मध्ये त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. सन 1978 मध्ये त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये डेब्यू केला होता तर सन 1985 मध्ये त्यांनी शेवटचा वनडे सामना खेळला होता.

विश्व विजेता टीममध्ये यशपाल शर्मा यांच्यासोबत खेळणार्‍या माजी क्रिकेटर मदनलाल (madanlal) यांनी शर्मा यांचं निधन झालं यावर विश्वासच होत नाही मात्र असं झालंय. आम्ही दोघांनी पंजाबमधून खेळण्यास सुरूवात केली होती आणि त्यानंतर विश्वचषक सोबत खेळलो होतो. कपिल देव (Kapil Dev) यांच्यासोबत देखील बातचित झाली असून याबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यशपाल शर्मा हे भारतीय क्रिकेट टीमचे नॅशनल सलेक्टर देखील होते.

यशपाल यांचा जन्म 11 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. पंजाबच्या शाळेकडून खेळताना त्यांनी 260 रन बनवले होते. तेव्हापासुन ते प्रकाशझोतात आले होते. यशपाल शर्मांनी सन 1983 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्टइंडीज विरूध्द खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 89 रन बनवले होते. त्या सामन्यात भारताचा विजय झाला होता. 1983 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरूध्द खेळताना देखील शर्मा यांनी 61 रन बनवले होते.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : yashpal sharma dies of heart attack former cricketer 1983 world cup

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी;
पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर
‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव,
विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार