Video : ‘त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता’, शहनाज गिलच्या डायलॉगचा भन्नाट म्युझिक व्हिडिओ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाइन – रसोडे में कौन था या डायलॉगवर रॅप साँग करणारा म्युझिक प्रोड्युसर यशराज मुखाते (Yashraj Mukhate) सध्या सोशल मीडियावर स्टार झाला आहे. त्यानं केलेलं क्रिएशन सोशलवर व्हायरल होताना दिसतं. आता त्यानं शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) च्या एका डायलॉगवर म्युझिक व्हिडिओ बनवला आहे, जो सध्या चर्चेत आहे. अद्याप व्हिडिओला 16 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

 

व्हिडिओत काय आहे ?

व्हिडिओत शहनाज गिल दिसत आहे. यात ती बोलत आहे की, क्या करू मैं मर जाऊ. त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता. यावेळी ती खूपच उदास आणि दुःखी दिसून आली हीच क्लीप घेऊन यशराजनं छान एडिटिंग केलं आहे. छान म्युझिक आणि डायलॉग अ‍ॅड केले आहेत. शहनाजचा तो सीन त्यानं वापरला आहे तो बिग बॉस 13 मधील आहे.

यशराजनं हा व्हिडिओ सोशलवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यानं लिहिलं की, शहनाज गिल कोणत्याही भाषेत पंजाबी बोलू शकते.

यशराजनं शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यशराजचं एडिटिंग सर्वांना आवडताना दिसत आहे. काहींनी हा व्हिडिओ शेअरदेखील केला आहे.