क्राईम स्टोरीताज्या बातम्यायवतमाळ

Yavatmal Crime | खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यमवतमाळ (Yavatmal Crime) येथील संकटमोचन परिसरात राहणारे काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष (congress city president) चंद्रकांत चौधरी (Chandrakant Chaudhary) यांच्या घरात जुगाराचा (Gambling Den) रंगला होता. अवधूतवाडी पोलिसांना (Avdhut Wadi police) याची माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 जणांना अटक (14 arrest) केली. या कारवाईमुळे यवतमाळ शहरात (Yavatmal Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून 6 लाख 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यवतमाळ (Yavatmal Crime) नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत हरिकिशोर चौधरी यांच्या फ्लॅटमध्ये जुगार सुरु होता.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून मधुकर प्रेमचंद गावंडे (रा. अंबानगर), राजकुमार केशवराव बनसोडे (रा. कोलुरा, ता. नेर), सुभाष राजाराम वानखेडे (रा. अंबानगर), दीपक बापूराव थोरात (रा. दारव्हा रोड), विजय अशोकराव सुरस्कर (रा. जयविजय चौक), उमेश रमेश उपाध्ये (रा. देवीनगर), श्रीकांत मारोतराव बावणे (रा. साईनगर), राजबहाद्दूर किशोरीलाल राजपूत (रा. शारदा चौक), अल्पेश रणजित फुलझेले (रा. उमरसरा), शेख हकीम शेख करीम (रा. गिलाणीनगर), नितीन डोमाजी चव्हाण (रा. कावेरी पार्क), दर्शन रमेश कोठारी (रा. दाते कॉलेज चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी छापा टाकताच तेथून 2 लाख 15 हजार 870 रुपये रोख, 14 मोबाईल, 8 दुचाकी, असा एकूण 6 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ (SP Dr. Dilip Patil Bhujbal),
अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे (Additional Superintendent of Police Khanderao Dharne),
पोलीस निरीक्षक मनोज केदारे (Inspector of Police Manoj Kedare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे (PSI Nagesh Khade),
संजय राठोड, गजानन दुधकोहळे, कुणाल पांडे, सागर चिरडे, समाधान, कांबळे, प्रकाश चरडे यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Yavatmal Crime | gambling den home congress city president 14 arrested Yavatmal news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या पुणे शहरातील आजचे इंधनाचे दर

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Ganesh Utsav 2021 | महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी दरम्यान पूजे संबंधी सेवांची मागणी 72 % वाढली, सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे आणि नागपुरमधून

Back to top button