यवतमाळ-वाशिम मतदारसंघात माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव, भावना गवळींनी राखला आपला गड

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. यावेळी मतदारांनी भावना गवळी यांना पुन्हा संधी दिली. तर माणिकराव ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

यवतमाळ वाशिम मतदारसंघात कॉंग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बळ देण्यात आलं. त्यांनी चार वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं. एकीकडे कॉंग्रेसने मोठी ताकद लावलेली असताना भावना गवळी यांना मात्र गटबाजीचा सामना करावा लागला. परंतु मागील निवडणूकीत विजयी झालेल्या सेनेच्या भावना गवळी यांनाच यावेळीही मतदारांनी कौल दिला आहे.

विजयी उमेदवार – भावना पुंडलिकराव गवळी(शिवसेना) – ५२७१६५

पराभूत – ठाकरे माणिकराव गोविंदराव(क़ॉंग्रेस) – ४१२२४७

एकूण उमेदवार – २४

उमेदवार पक्ष मिळालेली मतं

यवतमाळ-वाशिम मधील एकूण मतदार – १९ लाख १४ हजार ७८५

पुरुष मतदार – ९ लाख ९३ हजार ७२३

महिला मतदार – ९ लाख २१ हजार ०२९

यवतमाळ-वाशिममध्ये झालेले मतदान – ११ लाख ६९ हजार ८०४