YCMOU Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे Savitribai Phule Pune University (SPPU) प्र. कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे (YCMOU Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांनी शुक्रवारी (दि. १९) रोजी हे नियुक्तीचे आदेश दिले असून पुढील पाच वर्षांसाठी डॉ. संजीव सोनवणे कुलगुरूपदी (YCMOU Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane) कार्यरत राहतील.

डॉ. सोनवणे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान असून ते पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू तसेच डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड एक्सटेशन विभागप्रमुख कार्यरत होते. त्यांनी कम्युनिकेशन आणि गणित या विषयात एमएस्सी (M.Sc), डिस्टन्स एज्युकेशन विषयात एमए(MA) तसेच एमपी.एड (MP.Ed ) आणि पीएचडी (PhD.) केलेली आहे. (YCMOU Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane)

अध्यापन क्षेत्रात त्यांनी नवनवीन प्रयोग केले असून विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.
सोनवणे यांनी विविध परिषदेत सहभागी होत ६ आंतरराष्ट्रीय तसेच २३ राष्ट्रीय शोधनिबंध (Thesis) सादर केले.
शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील विविध विषयावर १५ पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
तसेच २३ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन देखील केले आहे.
त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरीबद्द्ल त्यांना इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स
(Indian Association of Teacher Educators) (२०१९), माइंड ट्री हेलन केलर अवार्ड
(Mind Tree Helen Keller Award) (२०१६) आणि पुणे महापालिकेचा बेस्ट टीचर्स पुरस्कार
(Best Teachers Award of Pune PMC) (२०१३) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता.

Web Title :  YCMOU Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane | yashwantrao chavan open university vice chancellor prof sanjeev sonwane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

Ajit Pawar | ‘अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो’, अजित पवारांचे फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी