Ajit Pawar | ‘अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो’, अजित पवारांचे फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पोपट केव्हाच मेला आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कळून चुकले आहे. मात्र हा पोपट (Parrot) जिवंत आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळावे, यासाठी आघाडीचे नेते बोलत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी पवार यांनी (Ajit Pawar) फडणवीसांना मिश्कील टोला लगावला.

पुण्यातील कार्य़क्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, कर्नाटकच्या निकालानंतर (Karnataka Election Results) कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेलं हे भाषण आहे, असं बोलावं लागतं. त्यांच्याजागी आम्ही असतो तरी असेच भाषण केले असते. पुढं राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगडच्या (Chhattisgarh) निवडणुका आहेत. म्हणून केलेलं हे राजकीय भाषण होतं, ते फार गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.

पोपट मेला, अरे दाखवा तरी कुठं पोपट मेलाय तो. उगं त्यांनी म्हणायचं पोपट मेला, आम्ही म्हणायचं मैना मेली,
कुणी म्हणायचं मोर मेला. कुणी मेलेलं नाही, सगळं काही जनतेच्यासमोर आहे.
जनतेच्या मनात जे असतं ते जनता करुन दाखवते. जनतेचा तो अधिकार आहे, जो संविधानाने (Constitution)
त्यांना दिला आहे. त्यामुळे पोपट मेला, पोपटीन मेली असं म्हणण्याचं काही कारण नाही.
कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. काँग्रेसला (Congress) देखील पराभव पत्कारावा लागला आहे,
असे म्हणत अजित पवारांनी फडणवीसांच्या भाषणावर टोला लगावला.

Web Title :  Ajit Pawar | devendra fadnavis said mahavikas aghadis parrot is dead ajit pawars tough gang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

Pune Crime News | पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर (Retired ACP) विनयभंगाचा गुन्हा दाखल

Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष