यो यो टेस्टमध्ये नापास

कोहली, धोनी, रैना, केदार जाधव झाले पास

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र भारताचा फलंदाज अंबाती रायडू याला इंग्लड दौ-याला मुकावे लागण्याची शक्यता आहे.  कर्णधार विराट कोहलीसह अनेकांनी यो-यो टेस्ट पास केली.  इंग्लंड जाणा-या टीममधील केवळ रायडू आहे जो या टेस्टमध्ये पास होऊ शकला नाहीये. त्याचा स्कोर १६.१हून कमी होता. त्यामुळे रायडू संघातून बाहेर होऊ शकतो.

रायडूने दीड वषार्नंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. आयपीएल २०१८मध्ये चेन्नईच्या अंबाती रायडूने ६०२ धावा केल्या होत्या. इंग्लंडला जाणा-या  संघाला शुक्रवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बोलावण्यात आले होते. यात कोहली, धोनी आणि भुवनेश्वर कुमारची यो-यो टेस्ट झाली. कोहली, धोनी, भुवनेश्वर, केदार जाधव आणि सुरेश रैनाने ही टेस्ट पास केली.

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये २७ आणि २९ जून रोजी दोन टी-२० सामने होणार असून ३ जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौ-यास सुरुवात होणार आहे. या दौ-यात भारत तीन टी-२०, तीन वनडे आणि पाच कसोटी क्रिकेट सामने खेळेल.