१८ हजार फुटांवर जवानांची योगसाधना

लेह (लडाख) : वृत्तसंस्था 

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशभरात उत्साह दिसून येत आहे.  दरम्यान, चीनच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनीही (आयटीबीपी) योग दिनामध्ये सहभाग घेताना लडाखमध्ये समुद्र सपाटीपासून १८ हजार फुटांवर योगसाधना केली.

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत असून सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. त्यात लष्कराच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला आहे.

नौदलाच्या सैनिकांनी युद्ध नौकांवर योगसाधना केली. तर सीमेवरही गस्त घालणाºया जवानांनी योग प्रात्याक्षिके सादर केली.

लडाख येथील १८ हजार फुटावर इंडो तिबेटीयन पोलीस दलाकडून सीमेवर गस्त घालण्यात येते १२ ही महिने बर्फाच्छादित असलेल्या या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थितीशी सामना करीत हे जवान सीमेचे रक्षण करीत असतात. हे जवानही योगदिनामध्ये सहभागी झाले आहेत.

इंडो तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांचा योगसाधना करतानाचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये लडाखमधील बर्फाच्छादित मैदानात आयटीबीपीचे जवान सूर्यनमस्कार घालताना दिसत आहेत.

पंतप्रधानाची योगसाधना

योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध मान्यवर आणि सर्वसामान्यांनी योगसाधनेमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगासनांना सुरुवात करण्याआधी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘उत्तराखंड कित्येक दशकांपासून योगविद्येचं केंद्र राहिला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या दृष्टीने या दिवसाचं महत्त्व खूप मोठं आहे. संपूर्ण जगात आज योग दिन साजरा होत आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. जेव्हा फूट पाडणाºया शक्तींचे सामर्थ्य वाढते, तेव्हा समाजाच्या घटकांमधील दरी वाढते. समाजात, आयुष्यात जेव्हा तणाव वाढतो, तेव्हा योग सर्वांना जोडतो,’ असं प्रतिपादन मोदींनी केलं.