बाबा रामदेव यांचा अ‍ॅलोपॅथीनंतर आता ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ॲलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे, असे वादग्रस्त विधान करणारे योगगुरु बाबा रामदेव Baba Ramdev यांनी आता ज्योतिष शास्त्रावर निशाणा साधला आहे. सर्व मुहूर्त इश्वराने तयार केली आहेत. ज्योतिषी काळ, घड्याळ आणि मुहूर्ताच्या नावावर फसवणूक करतात अशी टीका बाबा रामदेव Baba Ramdev यांनी केली आहे. ही देखील संपूर्ण 1 लाख कोटी रुपयांची इंडस्ट्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव एका योगशिबिरात बोलत होते.

कोरोना काळाच्या 15 महिन्यात 23 रुपयांनी महागले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या सरकार किती वसूल करतंय ‘टॅक्स’

ते म्हणाले की, ज्योतिषी बसल्या-बसल्याच नशीब सांगतात. मोदींनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या त्यावेळी कुणालाही माहिती नव्हते. कुठल्याही ज्योतिषाने कोरोना Corona येणार, असे सांगितले नव्हते. त्यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी म्हटले नाही. कोरोनावर बाबा रामदेव औषध आणतील, असेही कुणी सांगितले नाही. मी शुद्ध हिंदी अन् संस्कृत बोलतो. मधे-मधे इंग्रजी बोलणाऱ्यांनाही ठोकतो. कारण ते बोलत होते, की हिंदी आणि संस्कृत बोलणारे मोठे होऊ शकत नाहीत. आता हिंदी आणि संस्कृत बोलणाऱ्याने, असे झेंडे रोवले आहेत, की सर्वच जण म्हणत आहेत, हिंदी शिकायला हवे, संस्कृत शिकायला हवे असे ते म्हणाले. भविष्यात गुरुकुलात शिकणारे लोकच देश चालवतील. 20-25 वर्षांनंतर प्रयोग करून सांगेन, असे बाबा रामदेव म्हणाले.

पतंजलीने माशावर केले कोरोनिलचं परीक्षण
पतंजलीने Patanjali उत्तराखंडमधील नद्यांमध्ये आढळणाऱ्या जेब्रा फिश नावाच्या माशांवर कोरोनिलचे परीक्षण केले आहे. आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, नियमानुसार माशावर परीक्षण केले आहे. औषध, माणसासाठी वापरले जाऊ शकत नाही. तसेच माशावरही व्यवस्थीतपणे परीक्षण केले नसल्याचे खन्ना म्हणाले. माशाला कोरोना संक्रमित केल्यानंतरच कोरोनिल औषध द्यायला हवे होते. जेणे करून या औषधाचा व्हायरसवर काही परिणाम होतो, की नाही, हे स्पष्ट झाले असते. मात्र, तसे केले नसल्याचे ते म्हणाले.

READ ALSO THIS :  

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !