Yogi Adityanath Janta Darbar | योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमध्ये बंगाली लोकांनी मांडल्या समस्या; म्हणाले – ‘हिंदूंचे रक्षण फक्त…’

पोलीसनामा ऑनलाइन – Yogi Adityanath Janta Darbar | अनेक राज्यांमध्ये राजकारणी लोक जनता दरबार भरवत असतात. यामध्ये राजकारणी लोकांची थेट भेट घेऊन त्यांच्यासमोर नागरिक समस्या मांडत असतात. आपापल्या विभागातील किंवा मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेला मदत करण्यासाठी हा जनता दरबार भरवला जातो. अनेक लोक मदतीच्या व ठोस उपाययोजनेच्या अपेक्षेने या जनता दरबारमध्ये सहभागी होतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातर्फे देखील अशाच जनता दरबारचे आयोजन करण्यात येत असते. दरम्यान, त्यांच्या या जनता दरबारमध्ये थेट पश्चिम बंगलमधील नागरिक समस्या घेऊन आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल मधील काही हिंदू लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची जनता दरबारमध्ये भेट घेत त्यांच्याकडून समस्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली असल्याचे समोर आले आहे. हिंदूंचे रक्षण तुम्हीच करु शकता असे देखील या पश्चिम बंगालमधील लोकांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath Janta Darbar)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदू लोकांवरील समस्यांचे निरासरण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतात अशी ख्याती देशभर पसरली आहे. युपीमधील लखनऊ येथे योगी आदित्यनाथ यांचा जनता दरबार होता. यावेळी पश्चिम बंगालमधील हिंदू लोकांनी त्यांची तक्रार सांगितली. पश्चिम बंगालमधील या लोकांच्या जमिनी गुंडांनी बळकावण्यात आल्या असून त्यांना धमक्या देखील दिल्या जात असल्याचे या लोकांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री मी नाही. कोणी दुसरे आहे. य़ावर पुन्हा बंगाली लोक म्हणाले की, हिंदूंचे रक्षण तर तुम्हीच करु शकता. (Yogi Adityanath Janta Darbar)

सध्या सर्वत्र युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारमधील या पश्चिम बंगालमधील लोकांच्या
तक्रारीची सर्वत्र चर्चा आहे. योगी आदित्यनाथ हे त्यांच्या आक्रमक पवित्रासाठी आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी
नावाजले जातात. मागील काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्या लोकांवर जोरदार निशाणा
साधला होता. “सनातन धर्म ना बाबर मिटवू शकला ना रावण. मग आता सत्तेत असलेले सनातन कसा मिटवणार.
पूर्वीची सरकारे मुघल संग्रहालय बांधत असत. आम्ही संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले.
या लोकांना ना रामाची परंपरा आवडते ना कृष्णाची परंपरा. त्यांना भारताच्या समृद्ध वारसांचा अपमान करणेच आवडते.
” अशा कडक शब्दांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सुनावले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा