UPमध्ये ‘नॉन’ बेलेबल गुन्हयात देखील मिळणार ‘बेल’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजामीनपात्र गुन्हाबाबत आता अंतरिम जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंतरिम जामीन मिळण्याच्या संबंधित संशोधनात राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यानंतर आता उत्तरप्रदेश सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. असे असले तरी यावर अनेक अटी देखील लावण्यात आल्या आहेत. याआधी अशी अनेक कलमं होती ज्यावर अंतरिम जामीन मिळत नव्हता.

या नव्या नियमानुसार आता अंतरिम जामीनावर सुनावणी करताना आता आरोपीला उपस्थित राहण्याची गरज राहिलेली नाही, याशिवाय ज्यावेळी चौकशीसाठी बोलवण्यात येईल तेव्हा आरोपीला पोलिस अधिकाऱ्यांबरोबर उपस्थित राहावे लागेल.

अंतरिम जामीनाची जी सुविधा देण्यात येत आहे ती SC/ST कायद्यात सारख्या गंभीर गुन्हांच्या प्रकरणात लागू करण्यात येणार नाही. तसेच दहशतवादी गुन्हांशी जोडलेली प्रकरणे (अनलॉफुल एक्टिविटी कायदा 1967), ऑफिशयल अ‍ॅक्ट, गैंगस्टर अ‍ॅक्ट आणि मृत्यु दंडाच्या शिक्षेशी जोडलेल्या प्रकरणात अंतरिम जामीन मिळणार नाही.

नव्या प्रस्तावानुसार विधेयकानुसार अंतरिम जामीनासाठी जे कोणतेही आवेदन येईल ते आल्यानंतर त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत हे प्रकरण निकाली काढावे लागेल.

आरोग्य विषयक वृत्त –

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका