इथं बनणार आशियातील सर्वात मोठे विमानतळ ! 2023 पर्यंत पूर्ण होईल काम, जाणून घ्या योगी सरकारची योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून जेवर विमानतळ विकसित करण्याची योजना आखली आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारने जेवर विमानतळासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.

अर्थमंत्री सुरेश खन्नाणे यांनी सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 5 लाख 50 हजार 270 कोटी 78 लाख रुपयांचे बजेट सादर केले. या दरम्यान, त्यांनी जेवर विमानतळ सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचादेखील विशेष उल्लेख केला. उत्तर प्रदेश विधानसभेत यूपी सरकारने आपले पहिले पेपरलेस बजेट सादर केले आहे. केंद्रीय स्तराच्याधर्तीवर उत्तर प्रदेश सरकारने देखील पेपरलेस बजेट सादर केले आहे.

जेवर विमानतळासाठी तयार करणार 6 रनवे

अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की, जेवर विमानतळाजवळ यमुना एक्स्प्रेसवे हे इलेक्ट्रॉनिक शहर उभारले जाईल. अर्थमंत्री सुरेश खन्नो पुढे म्हणाले की, जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 6 रनवे तयार करण्यात येतील. यापूर्वी प्रस्तावित केलेल्या दोघांच्या तुलनेत राज्य सरकारने जेवर विमानतळाची धावपट्टी संख्या सहावर वाढविली आहे. तथापि, आणखी 2 रनवे नंतर तयार केले जातील. यावेळी जेवर विमानतळासाठी 2000 कोटीचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. विमानतळ तयार झाल्यानंतर वेगाने विकास होईल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. यासह बुंदेलखंडमध्ये डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे अर्थमंत्री सुरेश खन्ना म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने यमुना एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाची जेवार येथील विमानतळासाठी अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. जेवरमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी झुरिच विमानतळ आंतरराष्ट्रीय एजीची निवड झाली आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा 1,334. हेक्टर क्षेत्रापर्यंत पसरला आहे. त्यासाठी सुमारे 4588 कोटी रुपये खर्च येईल. हे 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आहे. या विमानतळामुळे या भागात विकास होईल, आणि अनेक प्रकारचे रोजगार देखील निर्माण होतील. त्यानुसार हे विमानतळ निर्माण करण्यासाठीची योजना आखली आहे.