नाशिकमध्ये तरुण दाम्पत्याची आत्महत्या

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन

अंबड येथे राहत्या घरी विषारी औषध सेवन करून पती – पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३५) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबडमधील केवल पार्कमध्ये जाधव दाम्पत्य राहत होते. आज (शुक्रवारी) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्याचे शेजारील नागरिकांच्या लक्षात आले , त्यांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.

दरम्यान, या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस अधीक चौकशी करीत आहेत.