धक्कादायक ! घरात घुसून कुटुंबासमोरच तरूणावर चाकूनं केले सपासप वार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – घरात घुसून आई-वडील आणि बहिणीसोमोर तरुणावर सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अमरावतीत घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून अजय बाबाराव दलाल (वय-25) या तरुणार चाकूने वार करुन खून केला. ही थरारक घटना आज (रविवार) दुपारी साडे तीनच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील आंबेडकर चौकात घडली आहे. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय दलाल याचा वाळूचा व्यवसाय होता. तसेच शहरात त्याचे अवैध धंदेही सुरु होते. आज रविवार असल्याने तो घरीच होता. दुपारची वेळ साधून तीन मारेकरी चारचाकी गाडीतून आले. त्यांनी अजच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यावेळी घरामध्ये अजयचे आई-वडील आणि बहिण होती. त्यांच्यासमोरच मारेकऱ्यांनी अजयवर वार केले. शेजाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पिस्तूल रोखत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आरोपींनी पळून जाताना तुम्ही आम्हाला आडवे येऊ नका, अशी धमकी दिली.

हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अजयला तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून अजयला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मारेकरी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like