Akola Crime | जमिनीच्या वादातून लहान भावाने केली थोरल्या भावाची हत्या

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Akola Crime | जमिनीच्या वादातून लहान भावाने थोरल्या भावाच्या छातीत चाकूने वार करुन खुन (murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तेल्हारा (Telhara) तालुक्यातील तळेबाजार (Talebazar) येथील भर रस्त्यावर गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजता घडली. शिवाजी गणेश मापे Shivaji Ganesh mape (वय ४०, रा. तळेगाव बाजार) असे खुन झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा लहान भाऊ हरिदास गणेश मापेHaridas Ganesh Mape (वय ३५) याला अटक Arrest केली आहे. (Akola Crime | younger brother killed the elder brother in a land dispute)

शिवाजी मापे आणि त्यांचा भाऊ हरिभाऊ मापे हे तळेगाव बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) बाजूला राहतात. या दोघांच्यामध्ये जमिनीवरुन वाद होता. त्यावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत. गुरुवारी रात्री त्यांच्यात याच विषयावरुन वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हरिदास मापे याने मोठा भाऊ शिवाजी मापे याच्या छातीवर वार करुन त्याला जखमी केले. जखमी अवस्थेतच शिवाजी हा बाहेर धावला. आरोग्य केंद्राजवळ (Health Center) तो रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

मात्र, त्याच्या मदतीला कोणी पुढे आले नाही. तब्बल दोन तास तो तसाच पडून होता. हिवरखेड पोलीस दोन तासांनंतर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांची मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी (postmortem) मृतदेह तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठविला. पोलिसांनी हरिदास मापे याला अटक केली आहे.

Web Title : Akola Crime | younger brother killed the elder brother in a land dispute

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सांगितलं सर्व काही

Pooja Chavan Suicide Case | पुजा चव्हाण प्रकरणात माजी मंत्री राठोड यांना क्लिन चीट? पुजाच्या आई-वडिलांनी नोंदवला जबाब, मंत्री पदासाठी हालचाली? जाणून घ्या नेमका काय जबाब नोंदवलाय पुजाच्या आई-वडिलांनी 

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी