चिंताजनक ! तुमचं WhatsApp ग्रुप चॅट देखील सुरक्षित नाही, जाणून घ्या कशी घ्याल काळजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुमचे व्हाट्सॲप ग्रुप चॅटसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. एक वेबसाइट voice.com ने शुक्रवारी रिपोर्टमध्ये खुलासा केला की, केवळ एका गुगल सर्चद्वारे व्हाट्सॲपचे खासगी ग्रुप चॅट सुद्धा सहज पाहता येतात, शिवाय त्या ग्रुपमधील साहित्य म्हणजे फोटो, व्हिडिओ किंवा ऑडियो आणि सदस्यांचे फोन नंबरसुद्धा मिळवता येतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार महिन्यांपासून फेसबुकला याबाबत माहिती आहे. एका भारतीय हॅकरने आपल्या ट्विटरद्वारे फेसबुकला नोव्हेंबर 2019 मध्ये याबाबत सावधान केले होते.

एखाद्यावेळी त्याने बक्षीसाच्या लालसेने फेसबुकला ही माहिती दिली असेल, परंतु फेसबुकने ही माहिती गांभिर्याने घेतली नाही. फेसबुकने टाळणारे उत्तर देऊन या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

अशा पद्धतीने लीक होते तुमच्या ग्रुपची माहिती
योग्य दक्षता न घेतल्यास वैयक्तिक व्हॉट्सॲप ग्रुप चॅटची लिंक गूगल सर्चच्या इंडेक्समध्ये जाईल. जेव्हा एखादा ग्रुप बनवणारा किंवा अ‍ॅडमिन ग्रुपचा इनव्हाइट कोड, जो एका यूआरएल प्रमाणे असतो, तो इंटरनेट किंवा एखाद्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेयर करतो.

यानंतर गुगल आपल्या सामान्य कार्यप्रणाली अंतर्गत त्या लिंक्स की सर्च इंजनमध्ये इंडेक्सिंग करून ठेवतो. यानंतर तो व्हाट्सॲप ग्रुप सर्च रिझल्टमध्ये दिसू लागतो. यानंतर कुणीही त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतो.

जर कुणी शेयर केले तर यूआरएल गुगलवर येईल
इंटरनेटच्या अथांग समुद्रात गुगल नेहमी नवनवीन यूआरएलच्या शोधात असते. अशावेळी जर एखाद्या व्हॉट्सॲप यूजरने वैयक्तिक चॅटची युआरएल लिंक सोशल मीडियावर शेयर केली तर स्वाभाविकपणे गुगल ही लिंक इंडेक्सिंग करेल, कारण गुगलचे प्रोग्रामिंगच यासाठी करण्यात आले आहे. आता प्रश्न असा आहे की, यूआरएल लिंकद्वारे कुणालाही वैयक्तिक चॅटमध्ये घुसण्यापासून रोखण्यात व्हाट्सअ‍ॅप किती सक्षम आहे.

लिंक शेयर करू नका
वेबसाइट व्हॉइस.कॉमला उत्तर देताना व्हाट्सॲपच्या प्रवक्त्याने म्हटले की, अशा ग्रुप चॅटच्या लिंक सर्च इंजिनवर इंडेक्स केल्याच जातील, कुणीही पब्लिक फोरमवर चॅटच्या लिंक शेयर करू नये.

गुगल सर्चवर पर्याय शोधला पण…
व्हाट्सॲपने सध्या या समस्येवर तात्पुरता उपाय शोधला आहे. गुगलच्या सर्च इंजनमधून वैयक्तिक ग्रुप चॅटच्या यूआरएल लिंक्स हटवल्या आहेत. आता गुगल सर्चवर पहिल्याप्रमाणे chat.whatsapp.com
टाईप केले तरी कोणत्याही ग्रुपपर्यंत पोहचता येणार नाही, कारण चॅट इनव्हिटेशन लिंकमधून व्हाट्सॲपने ‘नो इंडेक्स मेटा टॅग’ टाकला आहे.

आता सर्चमध्ये दिसेल, तुमचा सर्च मॅच करत नाही. परंतु, यामुळे कायमस्वरूपी उपाय होणार नाही. कारण अन्य सर्च इंजिनवर पहिल्याप्रमाणेच रिझल्ट येतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमीत कमी व्हाट्सॲपने आपली चुक मान्य करून एक सकारत्मक पाऊल उचलले आहे.