Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचं आई झाल्यानंतरचं पहिलं नवं गाणं रिलीज !

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव असते. सपनाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सपनाचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. आई झाल्यानंतरचं तिचं हे पहिलं गाणं आहे.

सपना चौधरीनं आई झाल्यानंतर दिल्लीत आपल्या एका कमबॅक परफॉर्मसनं साऱ्यांना चकित केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट व्हिडिओनं धमाल केली आहे. आई झाल्यानंतर ती आधीपेक्षाही सुंदर दिसत आहे. असं वाटत आहे की, सपनानं वेट लॉस केलं आहे. आता ती पुन्हा तिच्या जुन्या फिटनेसकडे आली आहे.

स्टार डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडिओ सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सपनाचं एक नवीन गाणं रिलीज झालं आहे. कत्ल असं या हरियाण्वी गाण्याचं नाव आहे.

यात सपना इंग्रजी बोलत स्टायलिश अंदाजात दिसत आहे. तिचा स्टायलिश लुक सर्वांनाच आवडला आहे, सध्या तिचं हे गाणं खूप व्हायरल होत आहे. लोक वारंवार हे गाणं पाहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

गाण्याबद्दल बोलायचं झालं रं हे गाणं सिंगर मोहित शर्मानं गायलं आहे. सुमीत बालंबिया यानं हे गाणं लिहिलं आहे.

4 ऑक्टोबर रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारीत बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत सिक्रेट मॅरेज केलं होतं. सपना चौधरीची लोकप्रियता गगनाला भिडली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साइड इफेक्ट्समधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.