Youtube | यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube वरील व्हिडिओला अनेकदा मिळालेल्या डिसलाईकच्या (Dislike) संख्येमुळे व्हिडिओ निर्मात्याला (Content Creators) ट्रोल करण्यात येते. मात्र आता यापासून YouTube वरील कंटेट क्रियटर्सची सुटका होणार आहे. कारण यूट्यूबने प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओखाली दिसणारी डिसलाईक संख्या प्रायव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व वापरकर्त्यांना व्हिडिओला मिळालेल्या डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही.

यूट्यूबने एक ब्लॉग पोस्टद्वारे माहिती देताना म्हटले की, YouTube वर असलेल्या कोणत्याही व्हिडिओवर डिसलाइकची संख्या दिसणार नाही. क्रिएटर्सना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्यावर डिजिटल हल्ला (Digital attack) करण्यासाठी या डिसलाईक्सचा वापर करणं वाढल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचं यूट्यूब तर्फे सांगण्यात आलं आहे. या नव्या बदलामुळे क्रिएटर आणि प्रेक्षक यांच्यामधील संवाद आदराने पार पडेल आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळेल असंही Youtube ला वाटतं.

भारतासह जगभरातील YouTube वर व्हायरल व्हिडिओ (Viral video) किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी मिळालेल्या लाईक्स आणि डिसलाईक्सच्या आधारावर बऱ्याच जणांना ट्रोल (Troll)केले जाते. हे हल्ले कधीकधी Content Creators वैयक्तिकरित्या देखील केले जातात. त्यामुळे कंपनीने यापूर्वी व्हिडिओमधील डिसलाईक बटण डिसेबल करण्याची सुविधा दिली होती. परंतु आता निर्मात्यांची जुनी मागणी पूर्ण करत YouTube ने डिसलाईक्सची संख्या लपवण्याचा निर्णय घेतला आहे.

काय होईल परिणाम?

युजर्स अजूनही गुगलच्या (Google) व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube वर व्हिडिओ डिसलाईक करु शकतील. मात्र इतर किती जणांनी तो डिसलाईक केला आहे हे ते त्यांना दिसणार नाही. जगभरात ऑनलाइन (Online harassment) घटनांमध्ये मोठी झाली आहे. सोशल मीडिया साईट्स चालवणाऱ्या कंपन्या याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याच्या तक्रारी राजकारणी, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत असतात. या वादामुळे फेसबुकला (Facebook) अलीकडे अनेक मोठ्या हल्ल्यांना सामोरे जाण्याची वेळ आली. आता यामध्ये काय फरक पडतो हे पहावे लागेल.

हे देखील वाचा

Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?

Sangli News | एकरकमी FRP चे आंदोलन सांगली जिल्ह्यात हिसंक वळणावर; राजारामबापू, क्रांती साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविले

India’s GDP | भारताच्या GDP मध्ये 2050 पर्यंत होईल 406 अरब डॉलरची वाढ, 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळेल नोकरी; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  YouTube | youtube will no longer show the number of dislikes count on videos know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update