बेरोजगारी हटवा ,पोलीस भरती पद संख्या वाढवा ; युवा सेनेचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – वाढती बेरोजगारीमुळे मोठ्या प्रमाणात तरुण युवकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.हाताला रोजगार नसल्याच्या कारणाने अनेक समस्यांना तरुणांना समोरे जावे लागत आहे. आज पोलीस भरती व इतर शासकीय जागांच्या रिक्त पदांची भरती होत नसल्याने विद्यार्थी व डिग्री नंतर वयोमर्यादा असल्याने वयोमर्यादेच्या बाहेर जात असल्याने बेरोजगारी चे प्रमाणात वाढ होत आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी कर्ज घेतात.शिक्षण करतात. नोकरी उपलब्ध नसल्याने हाती निराशा येऊन ते आत्महत्या, गुन्हेगारी, अवैध धंद्यांकडे वळत आहे.

बेरोजगारी हटवली पाहिजे यासाठी आज क्युमाईन क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यत युवा सेना वतीने युवक,युवती मोर्चात सहभागी झाल्या. चार मुख्य प्रमुख मागणीसाठी घोषणा देत नागरीकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना युवा सेना अध्यक्ष अँड.पंकज गोरे यांनी निवेदन देताना २०११/२०१९ दरम्यान महाराष्ट्रात पोलीस दलातील रिक्त जागा व नविन पोलीस शिपाई पद संख्या एकुण ४० हजार पोलीस भरती करावी. पोलीस भरती जम्बो पोलीस भरतीचे आयोजन करावे. अन्य शासकीय रिक्त पदे आहेत ते ताबडतोब भरावे. पोलीस भरती किंवा सर्वच प्रकारच्या शासकीय परिक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहिर करण्यात यावा.

आज पर्यत कुठल्याच मागण्या पुर्ण झाल्या नाही. त्याचा आम्ही सर्व युवक, युवती निषेध करीत असून पुढील कालावधीत वरील मागण्यां पूर्ण कराव्यात युवकांच्या हाताला रोजगार द्यावा. असे न झाल्यास आज निषेध करण्यात आला. पुढील काही दिवसात सर्व तरुण, तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार युवा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा युवा सेना वतीने देण्यात आला. यावेळी सोबत शहर प्रमुख संदिप मुळीक, ललीत पाटील, स्वप्निल सोनवणे, प्रेम खैरनार, निलेश चौधरी, सोनु गोरे, अमित खंडलेवाल आदी सहभागी झाले होते.

संबंधित मागणी बाबत निवेदन देण्यात आले आहे.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

ससून रूग्णालयात ‘कोडा’वर अधुनिक वैद्यकीय व सर्जिकल उपचार उपलब्ध

Video : ‘या’ अभिनेत्रीने तोडली परिवाराची ‘परंपरा’, सगळ्यांच्या विरोधात घेतला ‘हा’ निर्णय !

‘फिटनेस क्विन’ दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचं ‘पॅचअप’ ? पुन्हा झाले एकत्र ‘स्पॉट’

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानीच्या पदाधीकाऱ्यांचा सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत प्रवेश