Video : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अन् धनश्रीचा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने चाहत्यांना आणि देशवासियांना खास अंदाजात टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी कोरियोग्राफर धनश्री वर्माने शुभेच्छा दिल्या. या जोडीनं एक व्हिडिओ शेअर केला. यात हे स्वीट कपल ‘रंग दे बसंती’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांनी वेगवेगळा डान्स करून एकत्रित हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही महिन्यापूर्वी विवाह पार पडला. दोघेही सोशल मीडियावर चांगले ॲक्टिव्ह आहेत. युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये धनश्री युजी सोबत होती. विराट कोहलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनीसोबतचे या जोडीचे फोटो व्हायरल झाले होते.

युजवेंद्रसह धनश्रीचा एक स्वतःचा वेगळा फॅन फॉलोवर्स वर्ग आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. आपल्या महान देशाला हजारो सलाम. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! असा संदेशही युजवेंद्र चहलने दिला आहे.