Zareen Khan | कतरिनासारखी दिसते यावरुन जरीन खानने सोडले मौन; “तिच्यामुळे माझं नुकसान झालं”…

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनयनापेक्षा कतरिना कैफची हुबेहूब म्हणून जास्त चर्चा झालेली अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan) ही लाइमलाईटमध्ये आली आहे. अभिनेत्री जरीन खान हिने एका मुलाखतीमध्ये सिनेविश्वातील सत्य परिस्थिती मांडली. तिने सांगितले की कतरिना कैफ (Katrina Kaif) मुळे तिला काम मिळणे अवघड झाले होते. कतरिनासारखी दिसते यामुळे तिचे खूप नुकसान झाले असल्याचे जरीन खानने (Zareen Khan) सांगितले आहे.

अभिनेत्री जरीन खान हिने सलमान खानच्या (Salman Khan) ‘वीर’ चित्रपटामधून (Veer Movie) मनोरंजन विश्वामध्ये काम करायला सुरुवात केली होती. या चित्रपटामध्ये देखील ती कतरिना सारखीच दिसते (Katrina Kaif Duplicate) यावरुन चर्चा रंगली होती. मात्र आता अनेक वर्षांनंतर जरीनने मौन सोडले असून तिने यावर उत्तर दिले आहे. कतरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे मला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाले आहे. लोकांनी मला माझे टॅलेंट दाखवण्याची संधीच नाही दिली. कतरिनामुळे मला काम करण्याची संधीच मिळाली नाही अशी व्यथा अभिनेत्री जरीन खान हिने मांडली आहे.

एका मुलाखती दरम्यान जरीनला तिच्या कतरिना कैफ सारख्या दिसण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने उत्तर दिले की, “जेव्हा मी सिनेविश्वात पदार्पण केले तेव्हा मी हरवल्या प्रमाणाने होते. कारण मला कोणतीही फिल्मी बॅकग्राउंट नव्हती. माझी तुलना कतरिनाशी झाली तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण त्यावेळी मी तिची चाहती होती आणि मला ती खूप सुंदर वाटत होती, पण या गोष्टीचा माझ्या करिअरवर वाईट परिणाम झाला आणि लोकांनी मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच दिली नाही.”

पुढे ती म्हणाली, मला माझी कला सादर करण्याची संधीच नाही दिली. मला माझे टॅलेंट दाखवण्यापासून थांबवण्यात आले. मला या गोष्टींची चीड आहे की, सिनेविश्वामध्ये लोक टॅलेंट न बघता फक्त मैत्री आहे म्हणून कामे देतात. या इंडस्ट्रीमध्ये (Bollywood Industry Reality) माझे फारसे कनेक्शन नाही आणि लोकांशी छोट्या छोट्या गोष्टी लोकांशी कशा बोलायच्या हे देखील मला माहिती नाही.” असे मत अभिनेत्री जरीन खान हिने मांडले आहे.

अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan) ही पहिल्यांदा सलमान खान सोबत ‘वीर’ चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसली होती.
जरीनचे कौतुक अनेकांनी केले परंतू तिचे दिसणे हे जास्त कतरिना कैफ सारखे आहे याची चर्चा जास्त झाली.
बॉलीवुड विश्वामध्ये अभिनेत्री जरीन खानची ओळख ही कतरिनाची डुप्लिकेट म्हणून जास्त झाली.
यावर तिने आता खंत व्यक्त केली आहे. अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan Movies) हिने ‘वाजह तुम हो’
(Wajah Tum Ho), ‘हाऊसफुल 2’ (Housefull 2), 1921, ‘हेट स्टोरी 3’ (Hate Story 3) या चित्रपटांमध्ये
भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री जरीन खान शेवटची 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम अकेले तुम अकेले’
(Hum Akele Tum Akele ) या चित्रपटामध्ये दिसली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा