झिम्बाब्वेचे पराष्ट्र मंत्री सिबुसिसो मोयो यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

हरेरे : पोलीसनामा ऑनलाईन –  झिम्बाब्वेचे परराष्ट्र मंत्री सिबुसिसो मोयो (वय 61) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांनी बुधवारी (दि. 20) अखेरचा श्वास घेतला. राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते जॉर्ज चरांबा यांनी मोयो यांचे निधन झाल्याचे सांगितल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

मोयो हे माजी आर्मी जनरल होते. त्यावेळी सैन्याने सत्तेत हस्तक्षेप केल्याने सर्वाधिक कालावधीसाठी राष्ट्राध्यक्षपदी राहिलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार व्हावे लागले होते. मुगाबे 37 वर्षांच्या सत्तेनंतर 2017 साली सत्तेबाहेर झाले. 2017 मध्ये एमर्शन मननगागवा नवे राष्ट्राध्यक्ष झाले. मननगागवा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोयो यांची परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. मोयो हे अशा जनरलपैकी एक होते ज्यांना राष्ट्राध्यक्ष मननगागवा कॅबिनेटमध्ये आणि सत्ताधारी ZANU-PF पक्षात उच्च पदावर होते.

दरम्यान झिम्बाब्वे अशा आफ्रिकन देशांपैकी एक आहे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी होते. पण आता अचानकपणे वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा नवा स्ट्रेन देशात आल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.