श्रावणामध्ये डिलिव्हरी बॉय ‘मुस्लिम’ असल्याने ऑर्डर ‘रद्द’ केल्यानंतर Zomato नं दिला ‘असा’ दणका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजात हिंदू मुस्लिम द्वेष किती टोकाला पोहचला आहे याचा प्रत्यय जमावाकडून मुस्लिमांच्या होणाऱ्या हत्या या घटनांतून सातत्याने दिसून येतोय. आता दैनंदिन व्यवहारातून देखील हा द्वेष दिसून येत आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी वेबसाईट झोमॅटोवरून पंडित अमित शुक्ल नावाच्या व्यक्तीने जेवणाची ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर अमितला मेसेज आला.

मुस्लिम डिलीवरी ब्वॉय से सावन में नहीं लिया खाना, Zomato ने सिखाया सबक

मुस्लिम डिलिव्हरी बॉय आपली ऑर्डर घेउन येत असल्याचे कळताच अमित शुक्ला यांनी ऑर्डर रद्द केली. श्रावण महिना असल्याचे कारण देत डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी झोमॅटोकडे केली. एवढेच नव्हे तर डिलिव्हरी बॉय न बदलल्यास ऑर्डर रद्द करून पैसे परत द्या असे म्हणत त्या व्यक्तीने सोशल मीडियावर वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुस्लिम डिलीवरी ब्वॉय से सावन में नहीं लिया खाना, Zomato ने सिखाया सबक

यासंबंधीची पोस्ट सुद्धा पंडित शुक्ल यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ट्विटमध्ये म्हंटले की, मी झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर रद्द केलीय. कारण, झोमॅटो मला एका मुस्लिमाच्या हस्ते जेवण पाठवणार होते. मी डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितले. परंतु, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. मुस्लिमाच्या हातून आलेले जेवण खाण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही, तसेच मला रिफंडची गरज नाही, असे मी त्यांना सांगितले, असे शुक्ल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अन्नाला धर्म नसतो, डिलिव्हरी बॉय बदलण्यात येणार नाही – झोमॅटो

या ट्विटवर झोमॅटोने अमित शुक्ला या व्यक्तीला सणसणीत उत्तर दिले आहे. झोमॅटोने म्हंटले की, अन्नाला कोणताच धर्म नसतो, अन्न हाच धर्म आहे. अमित शुक्लाच्या अशा वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे तसेच झोमॅटोच्या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. डिलिव्हरी बॉय बदलण्यात येणार नाही असे सणसणीत उत्तर झोमॅटोने दिले आहे. दरम्यान, झोमॅटोने मला ब्लॉग केले असून त्यांच्या अॅपवर मला आधीची हिस्ट्री दिसत नाही, असे म्हणत वकिलाचा सल्ला घेऊन झोमॅटोविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार असल्याचे पंडित अमित शुक्ल यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ZomatoIN/status/1156429449258250240

आरोग्यविषयक वृत्त –