धार्मिक सलोखा राखण्यासाठी कार्य करणार: सचिन आडेकर

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

मराठा सेवा संघाचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष सचिन आडेकर यांचा उद्या (रविवारी) वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांनी विविध संकल्प केले आहेत. सद्यस्थिती पहाता सामाजिक आणि धार्मिक सलोख्याची गरज आहे. तो राखण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अंध आणि दिव्यांगांच्या संस्थांना मदत करण्याचे, त्यात सक्रीय सहभाग घेण्याचे त्यांनी ठरविले असून प्राणीमित्रांच्या संस्थांशी संपर्क ठेवून त्यांना उत्तेजन देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

गेली वीस वर्षे पुणे शहराच्या काँग्रेसचे ते पदाधिकारी आहेत. मागील वर्षभरापासून मराठा सेवा संघाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळत असून या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना संघटीत करण्यासाठी ते सतत क्रियाशील आहेत. याशिवाय दोन धार्मिक संस्थांचे ते विश्वस्त आहेत. या संस्थांमार्फतही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यात त्यांचा सहभाग असतो.