पुरंदर येथील विमानतळास लागणार तीन वर्ष : सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे. हे विमानतळ पूर्ण होण्यास जवळपास तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाभ प्रसंगी वर्तवली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापास महापालिका आयुक्त कुणाल कुमार,पीएमआरडीए चे आयुक्त किरण गित्ते यांनी पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा यावर मार्गदर्शन केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे आणि सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, पुरंदर येथे विमानतळ करताना तेथील ज्या व्यक्तीच्या जागा घेतल्या जाणार आहेत. त्यांच्या जीवनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. ते पुढे बोलताना म्हणाले, जिल्ह्यात मागील २ वर्षात २० हजार कोटीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले असून काही रस्त्याची कामे अंतिम टप्यात आहे, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यशासाना मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अंतर्गत २९० गावांपैकी २६५ गावे जलयुक्त करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले