अखिल भारतीय संस्कृत नाटक स्पर्धेत पुणे विद्यापीठाने पटकावला तिसरा क्रमांक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

अखिल भारतीय संस्कृत नाटक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत देशभरातील सतरा राज्यातून तब्बल 30 संस्कृत नाटक संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 12 व्या अखिल भारतीय संस्कृत छात्र प्रतिभा समारोहा निमित्त राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती द्वारा आयोजीत करण्यात आली होती.

पुणे विद्यापीठतील संस्कृत विभागाच्या संघाने ‘नारीहृदयविलासम्’ हे नाटक सादर केले होते. कृष्णा रामदासी, प्राजक्ता देशमुख, देविका, अमित सिंग, वेदरत्न, आकंक्षा बिराजदार, मुक्ता जोशी या विद्यार्थ्यांनी नाटकाचे सादरीकरन केले. तर अदिती देव, संपदा कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले. प्रा.डॉ. दिनेश रसाळ हे नाटकाचे मार्गदर्शक होते.

दरम्यान, वैयक्तिक गायन स्पर्धेत कुमारी मुक्ता जोशी यांना प्रथम पारितोषीक सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. विभाग प्रमुख डॉ. प्रा.शैलजा कात्रे, डॉ. प्रा.राजश्री मोहाडीकर डॉ. प्रा.जयंती त्रीपाठी प्रा.मुग्धा गाडगीळ यांसह विद्यार्थ्यांकडून विद्यापीठात या विजयी संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.