आईने रागविल्यामुळे शाळकरी मुलीची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन

आईने रागविल्यामुळे शाळकरी मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी काळेवाडी परिसरात घडली. सेजल दोरास्वामी मुदलीयार (14, रा. काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

वाकड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल ही पिंपरीतील एच.ए. स्कूलमध्ये इयत्‍ता 8 वीत शिक्षण घेत होती. शाळेती व्दितीय सत्राच्या परीक्षा संपल्यामुळे तिला सुट्टी लागल्याने ती दोन दिवसानंतर चेन्नई येथील आपल्या गावी जाणार होती. गावाला जाण्यापूर्वी घरामध्ये साफसफाई करण्याबाबत  तिच्या आईने तिला सांगितले होते. पण,  सेजलने साफसफाई केली नाही आणि त्यामुळेच आई तिच्यावर रागवली. या कारणावरून सेजलने शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये पंख्याला दोरीबांधुन गळफास घेतला. त्यानंतर घरच्यांनी तिला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.