आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुख्यमंत्री राज्याची जबाबदारी देणार : खासदार संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
केंद्रात आणि राज्यात भाजपचे खासदार,आमदार चांगले काम करत आहेत.आगामी निवडणुकीत देखील आमची सत्ता येणार असून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराची जबाबदारी दिली होती. त्याला न्याय देण्याचे काम केले आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री राज्याची देणार असल्याचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात लाक्षणिक उपोषणावेळी जाहीर केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी खासदार संजय काकडे म्हणाले की,देशात भाजपला चांगले वातावरण असून केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजप सत्ता येणार आहे. विरोधक जनतेची दिशाभूल करण्याच्या दृष्टीने सताधारी पक्षाबाबत समाजात चुकीचा संदेश पाठवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.

पुण्याचा खासदार राष्ट्रवादीचा असणार यावर काकडे म्हणाले की,काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये भंडारा आणि गोंदियाची जागा वाटपामध्ये जवळपास निश्चित झाले असल्याने अजित पवार यांनी पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार असणार असल्याचे सांगितले.मात्र कोणत्याही पक्षाचा उमेदवार रिंगणात असला.तरी भाजपकडून अनिल शिरोळे उमेदवार असून मागील मताच्या आकडेवारीपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना सुनावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार देशातील भाजपचे सर्व खासदार लाक्षणिक उपोषणास बसले आहे. पुण्यात देखील खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पदाधिकारी उपोषणास बसले होते.त्यावेळी राज्यसभा खासदार संजय काकडे बोलत होते.