आता शौचालयाची हि माहिती गुगल मॅपवर

मुंबई :  मुंबईतील नागरिकांना शौचालय शोधण्यास अडचणी तर मुंबईत येणाऱ्या नागरिकांना नेमके शौचालय कुठे आहे, हे समजत नाही. यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील शौचालयाची माहिती गुगल नकाशावर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईतील गर्दीत सार्वजनिक शौचालय शोधायचे झाले तर, ते शक्य होत नाही. त्यामुळे या लघुशंकेसाठी एखाद्याला शौचालयात जायचे असेल तर, ते शोधण्यासाठी त्याचा बराच वेळ निघून जातो. यावर तोडगा म्हणून पालिकेने मुंबई शहर व उपनगरांतील शौचालयांची माहिती गुगलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, एखाद्या शौचालयात पुरेशी सुविधा नसेल, तर अशा शौचालयाची तक्रार गुगलवर करणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.