कंटेनर आणि टँकरच्या धडकेत कंटेनरचालकाचा जागीच मृत्यू

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन

भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढील ट्रकला धडकला. यामध्ये कंटेनर चालक जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार (दि. 14) रोजी मध्यरात्री पुणे-मुंबई बेंगलोर महामार्गावर बाणेर येथे झाला.

लोकमान खान (वय 21, रा. रायपूरपुणा, रावेत, पुणे) असे मयत कंटेनर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान खान कंटेनरवर (टीएन 52, जे 1848) चालक म्हणून कामाला होता. बुधवारी मध्यरात्री पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना बाणेर येथे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढील ट्रॅकवर आदळला. या धडकेत चालक लोकमान खान गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.