कऱ्हाडमध्ये महाआरोग्य शिबिराचा साठ हजार रुग्णांनी घेतला लाभ

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून एकाच दिवसात तब्बल साठ हजार रुग्णांनी आरोग्याची तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबीरास पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.ससून रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.अजय चंदनवाले यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.त्यांच्या टीमने अस्थिरोग,त्वचारोग, स्त्रीरोग,नेत्र तपासणी,लठ्ठपणा तपासणी,ह्र्दयरोग तपासणी,कर्करोग तपासणी यासह अनेक आजारांची या शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबीरात कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.