सीडीएस परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून तिने पुण्यातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा देखील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीच्या यशाबद्दल तिचे देशभरातून यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच यासाठी पात्र ठरले. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे. त्याचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे.