चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंड; ‘पॉस्को’ मध्ये बदल

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील लहान मुलांवरील वाढते अत्याचार पाहता पॉस्को कायद्यात नवीन तरतूद करून हा कायदा आणखी कडक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्राने एका याचिकेवर सुनावनीच्या वेळी कायद्यात नवीन तरतूद करण्यासाठी लिखित उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षाखालील चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालय 27 एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.

सरकारच्या या कठोर पावलामुळे चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांना रोखण्यासाठी हा मोठा निर्णय म्हणावा लागेल. मात्र यापूर्वीचे प्रकरणांना हा लागू न झाल्याने तसेच गुन्हेगारच जर अल्पवयीन असेल तर त्यासंदर्भात काय निर्णय होणार? आत्ता पर्यंत अत्याचार झालेल्या पिडीतांना कसा न्याय मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.